Wednesday, February 18, 2015
Wednesday, February 11, 2015
Fighting procrastination
प्रयत्नांती परमेश्वर. किंवा समर्थ रामदास म्हणतात तसा प्रयत्न हाच परमेश्वर! वास्तविक जे करताना यत्न जाणवतच नाही, जे 'सहज' घडतं, तेच जगण्याचं खरं उद्दिष्ट असावं. सहज हा शब्दच किती सुन्दर आहे! संस्कृत फोड आहे 'सह जायते इति'. जे आपल्याबरोबरच जन्मतं ते. मात्र ते नेहमी प्रकट असेलच असं कुठेय? उलट हमखास सुप्तच असतं. मग ते शोधण्यासाठी प्रयत्न हा करवाच लागतो. सगळी मरगळ झटकून कार्यप्रवण व्हावच लागतं. मोठी स्वप्नं पहाणं चूक नाहीच, पण बसल्याजागीच विनासायास ती पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा करणं मुर्खपणाचं आहे! करायला हवंय ते न करता कमी महत्त्वाच्या कामांच्या भ्रामक व्यापात वेळ वाया घालवणे, ह्या रोगाचं नाव आहे Procrastination.
आणि उपाय? There is only one way to get something done, BEGIN!
आणि उपाय? There is only one way to get something done, BEGIN!
Tuesday, February 10, 2015
Shed off some thoughts!
पाणी जर गढूळ असेल, किंवा सतत उमटणारया लाटांनी अस्थिर असेल, तर त्यात प्रतिबिंब बघता येत नाही. तसचं मनाचं आहे. मनात कुठलेही विचार असतील, मग ते चांगले वाईट कुठलेही असोत, त्या विचारांमुळे मन अस्थिर होतं. शरीराला अपचन झालं कि जसं आपण लंघन करतो, आहारावर नियंत्रण करतो, तसचं मनाला अपचन झालं कि निर्विचार होण्याचा प्रयत्न करायला हवा. मनाचं शुद्धीकरण करायला हवं.
Subscribe to:
Comments (Atom)











